Belagavi

भेंडिगेरीत घराला आग; लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य भस्मसात

Share

बेळगाव तालुक्यातील भेंडिगेरी येथील एका घराला अचानक लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य भस्मसात झाले

होय, भेंडिगेरीतील होळप्पा उर्फ राजू मल्लिकार्जुन परशेट्टी यांच्या घराला शुक्रवारी दुपारी शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीत घरातील लाखो रुपये किंमतीचे संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. ५ पोती भात,  ३ पोती जोंधळा, मका या पिकांचा घरात केलेला साठा, कपाटात ठेवलेली ७० हजार रुपये रोख रक्कम, सोन्याचे ३ तोळे वनांचे दागिने व अन्य साहित्य या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवानेच या दुर्घटनेत प्राणहानी झाली नाही. आगीबाबत माहिती देताना परशेट्टी कुटूंबियांची डोळ्यात अश्रू दाटून आले होते.

आग लागल्याचे पाहताच गावातील युवकांनी पंपसेट सुरु करून पाण्याचे फवारे मारून आग विझवून संभाव्य मोठा अनर्थ टाळला. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद झाली आहे.

 

 

Tags: