Belagavi

राज्य सरकार रोजगारविषयक धोरण आखणार : मुख्यमंत्री

Share

बेरोजगारीची समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकार रोजगारविषयक धोरण आखणार असल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

बेळगावातील विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, कौशल्य विकास खात्यातर्फे गोगटे तांत्रिक संस्थेत भरविण्यात आलेल्या रोजगार मेळाव्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी सकाळी उदघाटन करण्यात आले. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, बदल हा आजच्या घडीचा परवलीचा शब्द आहे. जे कालानुरूप बदलले ते उद्योग-व्यवसायात यशस्वी झाले. होणारे बदल स्वीकारायला समाजाला सिद्ध करण्याचे काम सर्वानीच केले पाहिजे. उद्योगानी युवकांना रोजगार पुरवून समर्थ व्यक्तिमत्व निर्माण केले पाहिजे असे सांगून आजच्या रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या ७८ कंपन्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

यानंतर बोलताना बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी यावेळी, सीमाभागातील युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या हेतूने बेळगावात भव्य रोजगार मेळावा आयोजित केल्याबद्दल मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि कौशल्य विकास मंत्री डॉ. अश्वथनारायण यांचे आभार मानले.

याप्रसंगी उच्च शिक्षण व कौशल्य विकास मंत्री डॉ. अश्वथनारायण, धर्मादाय मंत्री शशिकला जोल्ले, नगरविकास मंत्री भैरत्ती बसवराज आदी मान्यवर उपस्थित होते. मेळाव्यात विविध ७८ नामवंत कंपन्यांनी भाग घेतला. ठिकठिकाणहून आलेल्या शेकडो रोजगार इच्छुक उमेदवारांनी मेळाव्याला उपस्थिती लावली.

 

 

 

Tags: