समान काम समान वेतन यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी अखिल कर्नाटक ग्रामीण वीज प्रतिनिधी कल्याण संघातर्फे गुरुवारी सुवर्णसौधसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

विविध मागण्यांसाठी अखिल कर्नाटक ग्रामीण वीज प्रतिनिधी कल्याण संघातर्फे गुरुवारी सुवर्ण गार्डनमध्ये धरणे आंदोलन छेडण्यात आले. न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सरकारी वीज पुरवठा कंपन्यांनी दाखल केलेली रिट याचिका मागे घेऊन सरकारने वीज प्रतिनिधींना आधार द्यावा, न्यायालयाने आदेश दिलेल्या तारखेपासून समान काम समान वेतन द्यावे, तसेच उच्च स्तरीय समिती नेमून वीज प्रतिनिधींना नोकरीत कायम करावे. 
कोरोनामुळे दगावलेल्या ग्रामीण वीज प्रतिनिधींच्या कुटुंबियांना सरकारने आर्थिक मदत द्यावी अशा मागण्या निदर्शक वीज प्रतिनिधींनी यावेळी केल्या. बाईट या आंदोलनात कांतराजू एच. एन., शिवशंकर गोळी, निरंजन, राघवेंद्र ए., नागराज सी., संगमेष यांच्यासह राज्यातून आलेल्या ग्रामीण वीज प्रतिनिधींनी भाग घेतला.


Recent Comments