Belagavi

ख्यमंत्री बदलाचा गोंधळ केवळ प्रसारमाध्यमांमध्ये मंत्री व्ही. सोमाण्णा यांचे स्पष्टीकरण

Share

मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणारे अनेक लोक आहेत. बसवराज बोम्मई यांनी गेल्या ४ महिन्यात अनेक चांगली कामे केली आहेत. सरकार हटविण्याच्या प्रयत्नात असणारे मूर्ख आहेत. त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असे मंत्री व्ही सोमाण्णा यांनी स्पष्ट केले.

सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. मंत्रिमंडळ पुनर्रचनेसंदर्भात प्रतिक्रिया देताना व्ही सोमाण्णा म्हणाले, मुख्यमंत्र्यांकडे सर्व अधिकार आहेत. आगामी २०२३ सालच्या निवडणूक बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालीच पार पडतील. मुख्यमंत्री बदलाचा गोंधळ केवळ प्रसारमाध्यमांमध्ये आहे. आमच्या पक्षात नाही. त्याचप्रमाणे सरकार हटविण्याचे स्वप्न खूप दिवस टिकणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

धर्मांतर विरोधी कायद्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना व्ही सोमाण्णा म्हणाले, सध्या काय परिस्थिती आहे याचा विचार केला पाहिजे. तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळातच या कायद्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. आता त्या कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. आणि सुधारणा करणे गरजेचे आहे, यासंदर्भात कायदामंत्री माधुस्वामी यांनी माहिती दिली असल्याचे सोमाण्णा यांनी सांगतले.

आपल्यापेक्षा राज्य मोठे, राज्यापेक्षा देश आणि देशापेक्षा मोठा समाज आहे. समाजात धर्मांतर कायदा हा चांगल्या कारणासाठी आणण्यात येत आहे. कायद्याचीही काही बाजू असते, हे काँग्रेसने जाणून घ्यावे, असा टोलाही मंत्री व्ही सोमाण्णा यांनी लगावला आहे.

प्रसारमाध्यमांना प्रतिकिया देताना मुख्यमंत्री बदल होणे अशक्य असल्याचे मंत्री व्ही सोमाण्णा यांनी सांगितले. शिवाय २०२३ सालच्या निवडणूका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखालीच पार पाडणार आहेत, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले आहे.

Tags: