Belagavi

धर्मांतर बंदी कायदा एका धर्माच्या विरोधात नाही : गृहमंत्री

Share

 कोणत्याही एका धर्माच्या विरोधात धर्मांतर बंदी कायदा नाही. कोणत्याही एका धर्माला त्रास देण्यासाठी नाही. धर्मांतरामुळे उडुपीत तर मंगळूरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळेच हा कायदा आणत आहोत असे गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले

गुरुवारी बेळगावातील सुवर्णसौधमध्ये विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेत धर्मांतर बंदी विधेयकावरील चर्चेत सहभागी होऊन बोलताना गृहमंत्री ज्ञानेंद्र म्हणाले, स्वेच्छेने केल्या जाणाऱ्या धर्मांतराला या कायद्यात कसलीच आडकाठी नाही. मात्र त्यासाठी ३० दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देणे सक्तीचे आहे. आमिषे दाखवून, जबरदस्तीने धर्मांतर केल्याचे सिद्ध झाल्यास शिक्षेची तरतूद आहे. त्याचप्रमाणे सामूहिक धर्मांतरासाठीही ३ ते १० वर्षांच्या शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले.

Tags: