Belagavi

कित्तूर विकास प्राधिकरणाचा काही निधी चन्नम्मा अध्यासनाला द्या : अशोक चंदरगी

Share

कित्तूर विकास प्राधिकरणाला मंजूर केलेल्या ५० कोटी निधीपैकी काही निधी आरसीयूच्या राणी चन्नम्मा अध्यासनाला द्यावा अशी मागणी कन्नड संघटनांच्या कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली.

आरसीयूच्या नव्या कॅम्पसची कोनशिला बसविण्यासाठी मुख्यमंत्री हिरेबागेवाडी येथे आले असता, चंदरगी यांनी त्यांची भेट घेऊन ही मागणी केली. राणी चन्नम्मा विद्यापीठात राणी चन्नम्मा यांच्या नावे २०१८मध्ये अध्यासन सुरु करण्यात आले. मात्र तेंव्हापासून त्याला निधीच मंजूर केलेला नाही. त्यामुळे कित्तूर विकास प्राधिकरणाला मंजूर केलेल्या ५० कोटी निधीपैकी काही निधी या अध्यासनाला द्यावा असे सांगितले. महाराष्ट्र एकीकरण समितीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल कन्नड संघटनांच्या कृती समितीतर्फे अभिनंदन करणारे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

 

 

Tags: