धर्मांतर बंदी विधेयक फाडणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी माफी मागावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केली.
बेळगावातील सुवर्णसौधमध्ये गुरुवारी पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा म्हणाले, ज्या पद्धतीने शिवकुमार यांनी विधेयकाची प्रत फाडून टाकली, त्याच पद्धतीने देशात जनतेने काँग्रेसला नाकारले आहे. आम्ही अल्पसंख्यांकांच्या विरोधात नाही. परंतु काँग्रेसने अल्पसंख्यांकांचे तुष्टीकरण करू नये. आपल्या कृतीबद्दल शिवकुमार यांनी सभागृहात माफी मागावी असे येडियुरप्पा यांनी सांगितले.
धर्मांतर बंदी विधेयक आज मांडण्यात येईल. ते सर्वानुमते मंजूर करावे असे आवाहन येडियुरप्पानी केले.


Recent Comments