Belagavi

प्रथम चिकित्सकांची सुवर्णगार्डनमध्ये निदर्शने

Share

आंध्रप्रदेशच्या धर्तीवर प्रथम चिकित्सकांना प्रशिक्षण देऊन ग्रामीण झोपडपट्टी भागात सेवा करण्याची संधी देण्याच्या मागणीसाठी कर्नाटक राज्य प्रथम चिकित्सक संघटनेच्या वतीने गुरुवारी सुवर्णसौधसमोर निदर्शने केली

बेळगावातील सुवर्णगार्डनमध्ये गुरुवारी विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य प्रथम चिकित्सक संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. फ्लो यासंदर्भात ‘आपली मराठी’सोबत बोलताना पी. के. कुमार यांनी सांगितले की, कर्नाटकात प्रथम चिकित्सक वैद्य म्हणून अनेकजण गेल्या अनेक वर्षांपासून सेवा बजावत आहेत. आंध्र प्रदेशात एक वर्षाचे प्रशिक्षण देऊन प्रथम चिकित्सकांना ग्रामीण आणि झोपडपट्टी परिसरात वैद्यकीय सेवा देण्याची मुभा दिली आहे. त्याच पद्धतीने कर्नाटकातील प्रथम चिकित्सकांनाही एक वर्षाचे प्रशिक्षण देऊन ग्रामीण आणि झोपडपट्टी परिसरात वैद्यकीय सेवा देण्याची मुभा द्यावी अशी मागणी केली. सुदर्शन आयोगाचा अहवाल जारी करून आमच्या मागण्या मान्य कराव्यात असे त्यांनी सांगितले.  या निदर्शनात राज्यभरातून आलेल्या अनेक प्रथम चिकित्सकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला.

 

Tags: