निपाणी पालिकेवरील भगवा ध्वज काढण्याची वादग्रस्त मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यानी सरकारकडे केली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून चर्चा केल्यानंतर इन न्यूजशी बोलताना गडाद म्हणाले, सरकारी इमारतींवर मान्यता नसलेला कोणताही ध्वज लावू नये असा नियम आहे. परंतु निपाणी पालिकेवर अनेक वर्षांपासून भगवा ध्वज फडकत आहे. तो काढण्यासाठी मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदने देण्यात आली. पण त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. म्हणून मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन दिले आहे. ते काय निर्णय घेतात हे पाहून आंदोलन करण्यात येईल.
एकंदर गडाद यांच्या या वादग्रस्त मागणीवर मुख्यमंत्री बोम्मई काय निर्णय घेतात हे पहावे लागेल.


Recent Comments