Belagavi

अलारवाड टू सुवर्णसौध! महिला काँग्रेसची भाजपाविरोधात रॅली!

Share

उत्तर कर्नाटकाच्या विकासासंदर्भात, गरीब जनतेबाबत दुर्लक्ष, समाजातील शांतता बिघडविणे याविरोधात काँग्रेस राज्याध्यक्ष डी के शिवकुमार आणि महिला घटक राज्याध्यक्षा पुष्पा अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्यावतीने भाजप सरकारविरोधात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.

https://fb.watch/a2AMKyhKNu/

एकाबाजूला काँग्रेस पक्ष समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसऱ्या बाजूला भाजप समाजात शांतता बिघडविण्याचे काम करत आहे. दरवाढ, जनविरोधी निर्णय या सर्वांमध्ये सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. याविरोधात बेळगाव आलारवाड क्रॉस ते सुवर्णसौध पर्यंत डी के शिवकुमार आणि महिला घटक राज्याध्यक्षा पुष्पा अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली महिला काँग्रेसच्यावतीने भाजप सरकारविरोधात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  या रॅलीची सुरुवात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेस राज्याध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते या रॅलींमध्ये सहभागी झाले होते.

या रॅलीदरम्यान डी के शिवकुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नुकतेच काँग्रेस युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून रॅली काढण्यात आली होती आणि आता महिला घटकच्या माध्यमातून हि रॅली काढण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, दैनंदिन जीवनात वाढत चाललेला खर्च याविरोधात महिला, तरुणांसह सर्वजण सत्ताधारी सरकारवर नाराज असून सत्ताधारी सरकार हे लोकशाही विरोधातील सरकार असल्याची टीका डी के शिवकुमार यांनी केली. कोविडमुळे निधन झालेल्या मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई, गरीब जनतेला सहकार्य देण्यास हे सरकार निष्फळ ठरल्याचे डी के शी म्हणाले.

यावेळी सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी यांनीही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. भाजप सरकार विरोधात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून भाजप सरकारच्या काळात होत असलेल्या दरवाढीचा निषेध आणि जनविरोधी निर्णयाविरोधात हे आंदोलन छेडण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया दिली.

सुवर्णसौध येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहासह सभागृहाबाहेरदेखील काँग्रेस पक्षाने आंदोलनाचा पवित्र घेत सत्ताधारी भाजप सरकार विरोधात निषेधाचे सूर उमटवले.

Tags: