बेळगावसह राज्याच्या उद्योग क्षेत्रात स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नियम तयार करण्याची मागणी भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांच्याकडे केली आहे.

भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, प्रिया पुराणिक यांनी कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांची भेट घेऊन या मागणीचे निवेदन दिले. बेळगावच्या उद्योग क्षेत्राकडून राज्याच्या दरडोई उत्पन्नात मोलाची भर घातली जाते. पण त्यांच्या समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. बिहार, छत्तीसगड, प. बंगालसारख्या राज्यातील असंख्य मजूर येथे रोजगारासाठी येतात. मात्र त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळत नाही.
त्यामुळे यासंदर्भात नियम बनविण्याची गरज आहे. बेरोजगारीमुळे स्थानिक युवकांच्या व्यसनाधीनता आणि तणाव वाढत आहे याकडे निवेदनात लक्ष वेधले आहे. मंत्री हेब्बार यांनी या संदर्भात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. यावेळी डॉ. सरनोबत यांनी मंत्री हेब्बार याना भारतमातेची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. यावेळी प्रिया पुराणिक, डॉ. संजय कुलकर्णी आदी उपस्थित होते.


Recent Comments