Accident

भरधाव वेगाचा हव्यास नडला; कार उलटून २ युवक ठार; ३ जखमी

Share

 चालकाचे नियंत्रण सुटून कार उलटून झालेल्या अपघातात कारमधील दोघे युवक जागीच ठार तर तिघेजण जखमी झाल्याची दुर्घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील गंगूर गावाजवळ घडली.

सलीम टक्कळकी (वय २०), सैफन तांबोळी (वय १७) अशी मृत युवकांची नावे आहेत. कार उलटताच सलीम जागीच ठार झाला तर गंभीर जखमी झालेल्या सैफनचा इस्पितळात उपचारांवेळी मृत्यू झाला. अन्य ३ जखमींवर विजापूर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. कारमधील युवक तंगडगीहुन देवरहिप्परगीला जाताना भरधाव वेगामुळे हा अपघात झाला. मुद्देबिहाळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.

 

Tags: