गृहभाग्य योजनेतून पौरकार्मिकांना देण्यात येणाऱ्या घरांच्या कामांचे भूमिपूजन नगरविकास मंत्री भैरती बसवराज यांच्याहस्ते बेळगावात करण्यात आले.

बेळगाव महानगर पालिकेच्या हद्दीतील आझमनगर येथे गृहभाग्य योजनेतून पौरकार्मिकांसाठी १२ कोटी ८ लाख रुपये निधीतून १२० घरांचे निवासी संकुल उभारण्यात येणार आहे. या कामाचे नगरविकास मंत्री भैरती बसवराज यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी उत्तरचे आ. अनिल बेनके, महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, उपायुक्त लक्ष्मी निपाणीकर, नगरसेवक रेश्मा पाटील, जयतीर्थ सौंदत्ती, इम्रान फतेखान आदी उपस्थित होते.


Recent Comments