Belagavi

आरसीयूच्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्र्यांना घेराव; लॅपटॉप मिळत नसल्याची तक्रार 

Share

लॅपटॉप देण्याच्या मागणीसाठी राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या विध्यार्थ्यानी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची कार अडवून घेराव घालून निदर्शने केल्याची घटना बुधवारी हिरेबागेवाडी येथे घडली.

होय, हिरेबागेवाडीतील मल्लप्पनगुड्ड भागात राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या नूतन कॅम्पसची कोनशिला बसविण्यासाठी मुख्यमंत्री बोम्मई आले होते. त्यावेळी अनुसूचित जाती-जमातीच्या विध्यार्थ्यानी त्यांची कार अडवून घेराव घालत निदर्शने केली. अनुसूचित जाती-जमातीच्या विध्यार्थ्याना मोफत लॅपटॉप देण्याची योजना आहे. आम्ही ३१६ विध्यार्थी आहोत. आम्हाला अद्याप लॅपटॉप देण्यात आलेले नाहीत. याबाबत कुलसचिवांकडे विचारणा केल्यावर एससीपी आणि टीएसपी अनुदान आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून आम्हाला योग्य प्रतिसाद मिळत नाही. लॅपटॉप अभावी आम्हाला प्रोजेक्ट करण्यात अडचणी येत आहेत. आम्हाला न्याय द्या अशी कैफियत या विध्यार्थ्यानी मांडली.

विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना लवकरच लॅपटॉप देण्याचे आश्वासन दिले.

 

Tags: