पुणे–बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४वर हिरेबागेवाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात ३ ठार झाले.

होय, भरधाव वेगाचा हव्यास जीवावर बेततो याची प्रचिती देणारा भीषण अपघात आज सकाळी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४वर हिरेबागेवाडीजवळ घडला. भरधाव कारने समोरूनजाणार्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या या दुर्घटनेत कारमधील ३ जण जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले. यल्लापूर येथील वासिम खान (वय ४०), सय्यद इस्माईल (वय ६५) आणि सुशीला फर्नांडिस (वय ६०) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. दोन जखमींना उपचारांसाठी बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.


Recent Comments