Khanapur

हलशी विटंबना प्रकरणी ३ समाजकंटकांना पोलिसांनी २४ तासांत अटक

Share

खानापूर तालुक्यातील हलशी येथे जगज्योती बसवेश्वर यांच्या चित्राला शेण फासून विटंबना केल्याप्रकरणी समाजकंटकांना पोलिसांनी २४ तासांत अटक केली आहे.

महापुरुषांच्या विटंबनेचा सत्र ग्रामीण भागातही पोहोचल्याचे हलशी येथील घटनेवरून स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्यावर वेळीच पायबंद घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. नंदगड पोलिसांनी हलशी घटनेतील समाजकंटकांना घटना घडल्याच्या २४ तासांत अटक करण्यात यश मिळवले आहे. सचिन ओमाण्णा गुरव, संजू ओमाण्णा गुरव आणि गणेश कृष्णाजी पेडणेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्या विरोधात भा. दं. सं. कलम १५३ जी, २९५, ४२७ आणि १२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हलशी गावातील बसवेश्वर चौकातील ध्वजस्तंभाच्या चौथऱ्यावरील बसवेश्वरांच्या चित्राला त्यांनी शेण फासून विटंबना केल्याचा आणि ग्रापं आवारातील कन्नड ध्वज जाळल्याची आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विधिमंडळ अधिवेशनातही या प्रकरणाचे पडसाद उमटले होते.

 

Tags: