जगाला कर्तव्य आणि समानतेचा संदेश देणाऱ्या जगज्योती बसवेश्वर यांचा भाषेच्या नावाने आजवर कोणीही अवमान केला नव्हता. त्यांची विटंबना करणे अतिशय दुःखदायक घटना असल्याची प्रतिक्रिया कुडलसंगमचे बसवजय मृत्यूंजय स्वामीजी यांनी दिली.

कदंब राजांची राजधानी असलेल्या खानापूर तालुक्यातील हलशी गावात जगज्योती बसवेश्वरांच्या चित्राची विटंबना आणि कन्नड ध्वज समाजकंटकांनी केली होती. त्याची माहिती मिळताच कुडलसंगम पंचमसाली महापीठाचे पहिले जगद्गुरू बसवजय मृत्यूंजय स्वामीजी यांनी हलशीला भेट देऊन त्याठिकाणी शुद्धीकरण करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली. 
यावेळी बोलताना स्वामीजी म्हणाले, कदंब राजांची राजधानी असलेल्या हलशी गावात जगज्योती बसवेश्वरांचा असा अवमान करणे दुःखदायक, क्लेशकारक आहे. कन्नडचे गतवैभव पुनरुज्जीवित करण्यासाठी येथे कदंब उत्सवाचे पुन्हा आयोजन ग्रापं आणि सरकारने केले पाहिजे. कर्नाटकात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ न देण्याची खबरदारी सरकारने घ्यावी असा सल्ला त्यांनी दिला.
यावेळी पंचमसेना जिल्हा कार्याध्यक्ष दोड्डगौडा हुजगौडर, ग्रापं उपाध्यक्ष संतोष हंजी, लिंगायत युवा वेदिकेचे सरचिटणीस अभिलाष बाळेकुंदरगी आदी उपस्थित होते.


Recent Comments