Belagavi

सतीश जारकीहोळींचे ‘नरो वा कुंजरोवा’!

Share

बेळगावातील घटनेबाबत केपीसीसी कार्याध्यक्ष . सतीश जारकीहोळी यांनीनरो वा कुंजरोवाअशी भूमिका घेतली आहे.

बेळगावात सुवर्णसौधमध्ये मंगळवारी पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी यांनी, बेळगावातील घटनेबाबत आम्ही काही प्रतिक्रिया देऊ शकत नसल्याचे सांगितले. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आम्हाला याबाबत काही बोलता येत नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी तपास चालवला आहे.

अशा लोकांवर कारवाई करा असे आम्ही आधीच सुचविले होते. त्यामुळे यात कोण सहभागी आहे हे सांगता येणार नाही. हे केवळ कर्नाटकातच नव्हे तर महाराष्ट्रातही घडत आहे. त्यामुळे याचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. यात काँग्रेस-भाजप असा प्रश्नच येत नाही. एक तर याच्या समर्थनार्थ किंवा विरोधात भूमिका घेतली पाहिजे. म्हणजे, सरकारलाही योग्य पावले उचलणे शक्य होते अशी प्रतिक्रिया जारकीहोळी यांनी दिली.

 

 

Tags: