Belagavi

३५ वर्षांनंतरही एड्स सामाजिक पीडा : आरोग्य मंत्री डॉ. के. सुधाकर

Share

 जगभरात एड्सने साडेतीन कोटी लोकांचा बळी घेतला आहे. कोणत्याही रूग्णाऐवजी आपण रोगाला विरोध केला पाहिजे असे मत आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी व्यक्त केले.

आरोग्य व कुटुंब कल्याण खाते, कर्नाटक राज्य, कर्नाटक स्टेट एड्स प्रिव्हेन्शन सोसायटी, जिल्हा प्रशासन, जिल्हा एड्स नियंत्रण आणि निवारण विभाग, विविध सरकारी खाती आणि संघ-संस्थांच्या सहयोगाने बेळगावातील जिरगे हॉलमध्ये मंगळवारी जागतिक एड्स दिन पाळण्यात आला. ‘असमानता संपवा, एड्स संपवा, सांसर्गिक रोग संपवा’ या सूत्रांतर्गत हा कार्यक्रम झाला. त्यात सहभागी होऊन बोलताना आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर यांनी, या कार्यक्रमाचे अचूक संयोजन केल्याबद्दल अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. सरकारने उचललेल्या पावलांमुळे आज देशात आणि राज्यात कोरोनाचा सामूहिक संसर्ग टाळण्यात यश आले आहे. मात्र दुर्दैवाने आज ३५ वर्षांनंतरही एड्स सामाजिक पीडा बनून राहिला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उत्तरचे आ. अनिल बेनके, जिप सीईओ दर्शन एच. व्ही., आयएएस अधिकारी डॉ. अरुंधती, के. लीलावती, डॉ. अप्पासाहेब नरट्टी, डॉ. रमेशचंद्र रेड्डी, विभागीय आरोग्य सहसंचालक डॉ. प्रभू बिरादार, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: