Belagavi

मंत्री ईश्वरप्पांचे महाराष्ट्र एकीकरण समितीवर आरोपाचे बोट

Share

केपीसीसी अध्यक्ष डी के शिवकुमार, ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकरआनंदाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाजूने बोलत आहेत, असे विधान ग्रामविकास आणि पंचायतराज विभागाचे मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी केले आहे.

मंगळवारी अनगोळ येथील कनकदास कॉलनी येथे भेट देऊन क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी अभिवादन केले.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ईश्वरप्पा यांनी डीकेशी, लक्ष्मी हेब्बाळकर आणि सिद्धरामय्या यांना टोला लगावत हे सारेजण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बाजूने मत मिळविण्यासाठी बोलत असल्याचे विधान केले. काँग्रेसचे सिद्धरामय्या हे दोन्ही बाजूने बोलत असल्याचा आरोपही मंत्री ईश्वरप्पा यांनी केलाय.

महाराष्ट्र एकीकरण समिती हि कृत्ये करत असल्याचे संपूर्ण कर्नाटकाला माहित आहे. त्यांना लगाम घालण्याचे काम सरकार करत आहे. आतापर्यंत ३२ जणांना अटक करण्यात आली असून यांची पोलीस चौकशी सुरु असल्याचे ईश्वरप्पा म्हणाले. कोणतीही संघटना, राजकीय पक्ष या प्रकरणात दोषी आहे हे लवकरच समजेल. परंतु कोणत्याही कारणास्तव महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांना सोडण्यात येणार नाही, असा इशारा ईश्वरप्पा यांनी दिला.

महाराष्ट्र एकीकरण समिती भ्याड असल्याचा आरोप करत रात्रीच्या वेळी अशी कृत्ये करण्यात आल्याचा निषेध नोंदवत पंतप्रधानांच्या निदर्शनास पत्राद्वारे हि घटना आणून देण्यात येणार असल्याचे ईश्वरप्पा म्हणाले. आगामी काळात सुवर्णविधानसौधसमोर कित्तूर राणी चन्नम्मा आणि क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचे पुतळे उभारण्यात येतील, असे आश्वासन ईश्वरप्पा यांनी दिले.

बेळगावमध्ये झालेल्या घटनांना महाराष्ट्र एकीकरण समितीला दोषी ठरवत या प्रकरणात सहभागी असणाऱ्या दोषींवर कारवाई करण्यात येणार आहे, असे विधान मंत्री ईश्वरप्पा यांनी केले आहे.

Tags: