Belagavi

नववर्षाच्या स्वागतासाठी मार्गसूची! ३० डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत निर्बंध खुल्या पद्धतीने आचरणासाठी निर्बंध

Share

नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागताचे खुल्या पद्धतीने आचरण करण्यावर सरकारने काही अटी जाहीर केल्या आहेत. ३० डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंत ठराविक नवी मार्गसूची जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.

नाताळ आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. यासंदर्भात तज्ज्ञ समितीशी चर्चा करून बेळगाव सुवर्णसौध येथे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महत्वाच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी नव्या वर्षाच्या स्वागतासाठी डीजे साठी परवानगी नसल्याचे स्पष्ट केले. एमजी मार्ग आणि ब्रिगेड मार्गासह राज्यभरात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी करण्यात येणाऱ्या खुल्या कार्यक्रमांना परवानगी नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. बार आणि रेस्टोरंटमध्ये केवळ ५० टक्के क्षमतेने नागरिकांना बसण्याची मुभा आहे. तसेच बार आणि रेस्टोरंटमधील कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस होणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नाताळ सण साजरा करण्यासाठी कोणतेही निर्बंध नसून यादरम्यान कोविड संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

याचप्रमाणे आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी बोलताना सांगितले कि, ३० डिसेम्बर ते २ जानेवारी पर्यंत नव्या वर्षाच्या स्वागतावर निर्बंध लावण्यात आले आहेत. ओमिक्रॉन च्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा हा निर्णय घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. नाताळ सण साजरा जाण्यासाठी चर्चमध्ये जाणाऱ्या नागरिकांवर कोणतेही निर्बंध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात येते. सध्या ओमीक्रॉन चा धोका वाढत चालला असल्याचे तज्ज्ञांचे मत असून या पार्श्वभूमीवर सरकारने सदर निर्बंध जारी केले आहेत. काही दिवसातच ख्रिश्चन समुदायाचा नाताळ सण येत असून यादरम्यान कोविड नियमांचे पालन करण्याची सूचनाही मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.

Tags: