देशात टिकटॉकवर बंदी घातल्यानंतर सध्या सोशल मीडियावर रिल्सची मोठी चलती आहे. उत्तर कर्नाटक भाषेत रिल्सच्या माध्यमातून सध्या रिल्सचा धुमाकूळ उत्तर कर्नाटकातील प्रकाश आर के या युवकाच्या नेतृत्वाखालील पंधरा ते वीस युवकांच्या सहयोगाने गानयोगी संघाने घातला आहे. रिल्सच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे आणि समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या युवकांवरील हा स्पेशल रिपोर्ट…

सर्वसामान्य जनतेपासून जगातील सर्वच नागरिकांना सोशल मीडियाने वेड लावले आहे. दिवसातील अर्धा अधिक वेळ हा सोशल मीडियासाठी प्रत्येक जण राखीव ठेवतो. या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अवलिया आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करतात. आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून फेमसदेखील होतात. उत्तर कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील प्रकाश आर के. या युवकाच्या नेतृत्वाखाली जवळपास १५ ते २० युवकांच्या सहयोगातून गानयोगी संघाच्या माध्यमातून देखील असाच प्रयत्न करण्यात आला आहे.
कधी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम, तर कधी जनतेला हसविण्याचे काम… कधी गावातील पुरातन काळातील विहिरींची स्वच्छता तर कधी कोविड काळात प्रत्येक अडलेल्या – गरजूला मदत करण्याचे कार्य.. यासह सोशल मीडियावरील रील हिरो ते वास्तवातील रियल हिरोची भूमिका साकारत करमणुकीसह समाज प्रबोधनाचे कार्य या युवकांच्या माध्यमातून होत आहे. आपल्या खास उत्तर कर्नाटकी भाषेत बनविण्यात येणारे रिल्स, मिम्स हे सोशल साईट फॉलोअर्सच्या पसंतीस उतरले आहेत. यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे गानयोगी संघाचे अध्यक्ष प्रकाश आर के यांनी… पाहुयात त्यांच्याच शैलीत त्यांच्या रिल्सबद्दलची अधिक माहिती..
गानयोगी संघाच्या वतीने विजापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती भागात लाल बहादूर शास्त्री बाजारपेठेचीही स्वच्छता करण्यात आली आहे. गुटखा, तंबाखूची पाकिटे, इतर कचरा गोळा करून स्वखर्चाने या कचऱ्याची विल्हेवाट या संघाने लावली आहे. आपले आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन या संघाच्यावतीने करण्यात येते… यासंदर्भात सचिन पालीकार या युवकाने व्यक्त केलेली प्रतिक्रिया पाहुयात….
केवळ करमणूक आणि सोशल मीडियाच्या व्यसनाधीन न होता करमणुकीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या गानयोगी संघाच्या सर्व तरुण सदस्यांनी नागरिकांनी लोकप्रतिनिधींना एक उत्तम संदेश दिला आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद तर आहेच शिवाय प्रत्येक युवा वर्गाने याचा आदर्श घेण्याचीही गरज आहे.


Recent Comments