Belagavi

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे स्वप्न कुणी पाहू नये : आर. अशोक

Share

राज्यात मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे कोणीही स्वप्न पाहू नये. आगामी केंद्रीय नेत्यांच्या निवडणूक मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याच नेतृत्वाखाली होणार असल्याचे प्रतिपादन महसुली मंत्री आर अशोक यांनी केले आहे.

बेळगाव सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या बाजूने बॅटिंग केली असून आम्ही सर्वजण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सोबत असल्याचे ते म्हणाले. वाऱ्यावर येणाऱ्या बातम्या या काल्पनिक असल्याचे सांगत कोणीही कोणतीही भविष्यवाणी वर्तवूदे त्या भविष्यवाणीशी आपला तिळमात्र संबंध नसल्याचा टोला लगावत मुख्यमंत्री बदलासंदर्भातील चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.

आपल्याच मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी भावनिक दृष्ट्या मतदारांशी संवाद साधून जनतेच्या प्रेमाने विजय मिळविला असून यासंदर्भात आपलीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे, असे महसूल मंत्रीय आर अशोक यांनी स्पष्ट केले.

येडियुरप्पा २ वर्षे मुख्यमंत्रीपदावर होते. आणि बसवराज बोम्मई यांचा कार्यकाळ केवळ २ महिन्यांचा आहे. आतापासूनच मुख्यमंत्री बदलाची चर्चा करणे निरर्थक असून मुख्यमंत्री पदी बोम्मईच राहणार असल्याचे ठाम वक्तव्यही आर अशोक यांनी केले. याबद्दल ज्यांना भविष्य सांगायचे आहे त्यांना आपण विचारू शकता. कोणत्याही परिस्थिती बसवराज बोम्मई हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहणार असल्याचे स्पष्टीकरण महसूलमंत्र्यांनी दिले.

माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतही अशीच चर्चा सुरु होती. मात्र आता बसवराज बोम्मई यांच्यासंदर्भात अशी कोणतीही गोष्ट घडणार नसून राज्यात मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे महसूल मंत्री आर अशोक यांनी स्पष्ट केले आहे.

Tags: