आम्ही दिल्लीच्या मार्गदर्शनाखाली अधिकार गाजवतो. मला खुर्ची सोडायला होत नाही, शेतकऱ्यांना मदत करणे शक्य नाही, असे बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट सांगावे, असा टोला शेतकरी संघाचे राज्य अध्यक्ष कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी लगावलाय.

केंद्र सरकारने कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली आहे. परंतु अद्याप हे कायदे रद्द करण्यात आले नाही. यासाठी बेळगावमध्ये सुरु असलेल्या सुवर्णसौध येथील हिवाळी अधिवेशनात शेतकरी संघटनेचे राज्य अध्यक्ष कोडीहळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते या आंदोलनात मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात अपयश आले असून खुर्ची टिकविण्याच्या दडपणाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण कोणतीच मदत करू शकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे, असा आग्रह करण्यात आला. यावेळी राज्य सरकार विरोधात शेतकरी आंदोलकांनी तीव्र संताप व्यक्त केला.


Recent Comments