Belagavi

मुख्यमंत्री म्हणून बोम्मईच कायम राहतील : मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी

Share

 मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. कोण काय म्हणतंय माहित नाही. पण बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थिर आहे असे समाज कल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी स्पष्ट केले.

सोमवारी बेळगावात सुवर्णसौधमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री पुजारी म्हणाले, मुख्यमंत्री बोम्मई आपल्या जिल्ह्यातील लोकांना पाहून भावुक होऊन बोलले असतील. प्रशासनाचा प्रमुख म्हणून मतदार संघातील लोक कुटूंबाचे सदस्य म्हणून ते बोलले असतील. राज्याच्या विकासासाठी बोम्मई प्रयत्न करत आहेत. कोणकोण कायकाय बोलत असतील ते त्यांच्यावर सोडून द्यायला हवे. मी स्पष्ट सांगतो, मुख्यमंत्री म्हणून बोम्मईच कायम राहतील. त्यांच्या नेतृत्वाखालीच सरकार वाटचाल करेल.

महाराष्ट्र एकीकरण समितीवर प्रतिक्रिया देताना, भाषेच्या नावावर राजकारण करणे चुकीचे आहे. बेकायदा कृत्यांना कायद्याने उत्तर देण्यात येईल असे पुजारी यांनी स्पष्ट केले.

 

 

Tags: