शिवपुतळा आणि संगोळ्ळी रायण्णा पुतळा विटंबनेवरून निर्माण झालेले प्रक्षुब्ध वातावरण हळूहळू थंड होत असतानाच जगज्योती बसवेश्वरांच्या पुतळ्याची आणि कन्नड ध्वजाची समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना खानापूर तालुक्यात घडली आहे.

होय, महापुरुषांच्या विटंबनेवरून बेळगाव जिल्ह्यात पेटलेली ठिणगी विझते न विझते तोच खानापूर तालुक्यातील हलशी गावात कन्नड ध्वज जाळून संत बसवेश्वरांच्या प्रतिमेला काळी शाई फासून विटंबना करण्यात आली आहे. ग्राम पंचायत आवारात कन्नड ध्वज जाळून तेथील चौकातील ध्वजस्तंभाच्या चौथऱ्यावरील जगज्योती बसवेश्वर यांची प्रतिमा चेहऱ्यावर काळ्या शाईने विद्रुप करण्यात आली आहे.
अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या या कृत्याचा सर्वभाषिकातून निषेध करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंदोबस्त वाढविला आहे. या नीच कृत्याचा सर्व थरातून निषेध होत आहे. हे हीन कृत्य करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.


Recent Comments