चुकीच्या रेल्वेत चढल्याचे लक्षात आल्याने धावत्या रेल्वेतून उडी मारल्याने बीबीएमपी कर्मचाऱ्याचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री हुबळी रेल्वे स्थानकावर घडली.

बृहत बेंगळूर महानगर पालिकेचे कर्मचारी रंगराजू एस. ए. सोमवारी कामावर हजर होण्यासाठी म्हणून हुबळी रेल्वे स्थानकात एका रेल्वेत चढले. मात्र ती रेल्वे बेळगावकडे जात असल्याचे समजल्याने त्यांनी धावत्या रेल्वेतून प्लॅटफॉर्मवर उडी घेतली. परंतु दुर्दैवाने रेल्वेच्या चाकांखाली आल्याने ते जागीच ठार झाले. रंगराजू यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
Recent Comments