क्षुल्लक कारणावरून महानगर पालिकेच्या आयुक्तांवर चौघांनी हल्ला करून त्यांना जखमी केले. ही खळबळजनक घटना सोमवारी विजापूर शहरात घडली.

विजापूर महानगर पालिकेचे आयुक्त विजयकुमार मेक्कळकी याना सोलापूर रस्त्यावर अडवून समर्थ सिंदगी व अन्य तिघांनी हल्ला करून जखमी केले. हल्ल्यात जखमी झालेल्या आयुक्तांना खासगी इस्पितळात उपचार करून घरी सोडण्यात आले. पोलिसांनी आरोपी समर्थ सिंदगी याला अटक केली असून त्याच्या तिघा फरारी साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत आदर्शनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments