Belagavi

‘मीच मुख्यमंत्री’ म्हणत फिरणारे लै जण ! आ. यत्नाळ यांचा निराणींवर निशाणा

Share

 ‘आता मीच मुख्यमंत्रीअसे सांगत फिरणारे अनेकजण आहेत. त्यांना मुख्यमंत्री केल्यास विधानसौध वेगळेच रूप घेईल अशा शब्दांत विजापूरचे . बसनगौडा पाटीलयत्नाळ यांनी उद्योग मंत्री मुरुगेश निराणी याना त्यांचे नाव घेता टोला लगावला.

सोमवारी सकाळी सुवर्णसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना आ. यत्नाळ यांनी मी कोणाच्या हातचे बाहुले बनून राहणारा नव्हे. पक्षाने मला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केले तर संपूर्ण पक्ष माझ्या समर्थनार्थ उभा राहील असा पलटवार निराणी यांच्यावर केला.

महाराष्ट्रात कन्नड ध्वज जाळल्याप्रकरणी प्रतिक्रिया देताना आ. यत्नाळ म्हणाले, या सगळ्यात एका राष्ट्रीय पक्षाचा हात आहे. हे एक मोठे षडयंत्र आहे. बोम्मई सरकारला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे. संरक्षण पुरवून गुंडांकडून दगडफेक करवून हे प्रकार घडविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

एसडीपीआयवर बंदी घालण्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे हे पहावे लागेल. महाराष्ट्र एकीकरण समिती मराठा समाजाची नाही. बेळगाव मनपा निवडणुकीत समितीचे काय झाले? आधी ५ जागा जिंकत, आता एकही जागा जिंकता आलेली नाही. मराठी भाषिकांनीच महाराष्ट्र एकीकरण समितीला नाकारले आहे असा दावा आ. यत्नाळ यांनी यावेळी केला.

 

 

 

Tags: