महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दादागिरीला आळा घालण्यासाठी सरकार लवकरच पावले उचलेल असे कृषिमंत्री बी. सी. पाटील यांनी सांगितले.

बेळगावात सुवर्णसौधमध्ये सोमवारी पत्रकारांशी बोलताना कृषी मंत्री बी. सी. पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा हे सगळे शूर योद्धे होते. देशासाठी त्यांनी प्राणत्याग केला. त्यांचा अवमान करणे सर्वस्वी चुकीचे आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दादागिरीला आळा घातला नाही तर बेळगावात कानडी लोकांचे जगणे कठीण होऊन जाईल. त्यामुळे लवकरच सरकार यावर पावले उचलणार आहे असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकार, शिवसेना आणि काँग्रेसचे साटेलोटे आहे. महाराष्ट्रात भाजपने त्यांच्याशी हातमिळवणी केलेली नाही. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी याचा निषेध केला पाहिजे असे मंत्री पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री बोम्मई काल शिग्गाव मतदारसंघात भावुक होऊन बोलल्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना कृषिमंत्री म्हणाले, संवेदनशील व्यक्ती भावुक होऊन बोलतात. आपल्या मतदारसंघातील लोकांशी ते भावुक होऊन बोलले असावेत. त्यातून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही.


Recent Comments