Belagavi

आमिषे, जबरदस्तीने धर्मांतर टाळण्यासाठी नवा कायदा : आ. पी. राजीव 

Share

 आमिषे दाखवून, प्रसंगी जबरदस्तीने धर्मांतर करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळेच सरकार धर्मांतराच्या विरोधात कडक कायदा आणत आहे असे कुडचीचे . पी. राजीव यांनी सांगितले.

विधिमंडळ अधिवेशनात भाग घेण्यासाठी जाण्यापूर्वी सोमवारी ‘आपली मराठी’सोबत बोलताना आ. पी. राजीव म्हणाले, या देशात सगळ्या घटनांची नोंद होते. स्वेच्छेने कोणी धर्मांतर करत असेल तर सरकार त्याला विरोध करणार नाही. मात्र जोर-जबरदस्तीने, आमिषे दाखवून धर्मांतर करण्याचे प्रकार रोखण्यासाठीच नवा कायदा आणण्यात येत आहे. गरिबी आणि अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्मांतर करण्यावर या कायद्याने बंदी घातली जाणार आहे असे त्यांनी सांगितले.

बेळगावात सर्व भाषेचे लोक गुण्यागोविंदाने रहात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा हे आमचे आदर्श आहेत. मात्र काही समाजकंटक बेळगावातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार त्यांना चांगला धडा शिकविणार आहे असे आ. पी. राजीव म्हणाले.शांती बिघडवणाऱ्या काहींना पोलिसांनी अटक केली असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Tags: