सिद्दापूर तालुक्यातील मत्तिहळ्ळी गावाजवळ मृतावस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या मृत्यूचे कारण शोधून काढण्यात वनाधिकाऱ्यांना यश आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

सिद्दापूर तालुक्यातील मत्तिहळ्ळी गावाजवळ सर्व्हे क्र. १७७ वन खात्याचे कर्मचारी गस्त घालत असताना एका बिबट्याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. त्याची तातडीने उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी बिबट्याचे सर्व चार पंजे कापून नेल्याचे आढळून आले. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी तपास सुरु केला असता, दोन शिकाऱ्यांनी बिबट्याची अवैध शिकार करून त्याचे चारही पंजे कापून नेल्याचे तपासात स्पष्ट झाले.
शिरसी उप वनसंरक्षणाधिकारी एस. जी. हेगडे, सहायक वनसंरक्षणाधिकारी सी. एन. हरीश यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धपूर क्षेत्रीय वनसंरक्षणाधिकारी शिवानंद एस. निंगानी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कसून तपास करून बिबट्याची शिकार केलेल्या सिद्धपूरचे रहिवाशी मूर्ती गणपति नायक आणि केशव गोविन्दगौड़ा यांना बिबट्याच्या पंजांसह तसेच हत्यारांसह अटक केली. त्यांच्यावर वन्यजीव सुरक्षा कायदा 1972 सेक्शन 9 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Recent Comments