Khanapur

माजी आ. अरविंद पाटील यांच्याकडून पुतळा विटंबनेचा निषेध

Share

देशभक्तांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ खानापूरचे माजी . डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी समर्थकांसह नंदगड येथे निषेध मोर्चा काढून राष्ट्रपुरुषांच्या पुतळयाला दुग्धाभिषेक केला.

खानापूरचे माजी आ. व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी देशभक्तांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ समर्थकांसह नंदगड येथे निषेध मोर्चा काढून राष्ट्रपुरुषांच्या पुतळयाला दुग्धाभिषेक केला. बेंगळुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषधार्थ नंदगड येथील शिवप्रेमींनी माजी आ. अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढला. नंदगडमधील प्रमुख रस्त्यांवरून हा मोर्चा काढण्यात आला.

त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्यांना दुग्धाभिषेक करून पूजन करून अभिवादन करण्यात आले. फ्लो याप्रसंगी बोलताना माजी आ. अरविंद पाटील म्हणाले, आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बेंगळूर येथे विटंबना करण्यात आली. त्याचप्रमाणे ब्रिटिशांच्या विरोधात क्रांतीची ज्वाला पेटवून देशाच्या स्वातंत्र्ययुद्धाची नांदी करणाऱ्या क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची बेळगावात विटंबना करण्यात आली. या दोन्ही घटना अत्यंत निषेधार्ह आहेत. अशा समाजकंटकांचा वेळीच बंदोबस्त केला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी नंदगडवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदगडचे सीपीआय सतीश माळगोंड यांच्या नेतृत्वाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

 

 

Tags: