Belagavi

विध्यार्थ्यांना अंडी देण्याचा निर्णय रद्द करावा : दयानंद स्वामीजी

Share

राज्यातील सरकारी, अनुदानित शाळा आणि अंगणवाड्यात विध्यार्थ्यांना अंडी देण्याचा निर्णय सरकारने रद्द करून अधिक सकस, पौष्टिक शाकाहारी पदार्थ द्यावेत अशी मागणी विश्वप्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामीजी यांनी केली आहे.

रविवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना दयानंद स्वामीजी म्हणाले, मुलांमधील कुपोषण, शक्तिहीनता दूर करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचे अभिनंदन करतो. पण त्यासाठी मुलांना दिले जाणारे पदार्थ सर्वाना मान्य असायला हवेत. जात-धर्म, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेदभाव न करता मुले एकत्र शिकतात ती शाळा हे एक पवित्र ठिकाण आहे.

तेथे ज्यांना आवडते त्यांना अंडी देऊ, आवडत नाही त्यांना फळे देतो असे सरकारने म्हणणे हास्यास्पद आहे.  यावेळी राष्ट्रीय बसव दलाच्या केंद्र समितीचे अध्यक्ष चन्नबसवानंद स्वामीजी, प्रभुलिंग स्वामीजी, बसवप्रकाश स्वामीजी, संपतराज बागरेचा, राजू दोड्डन्नावर, गौतम चोप्रा, अशोक भेंडिगेरी, आनंद गुडस आदी उपस्थित होते.

 

Tags: