बेंगळुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या नीच कृत्याचे शिवाजी महाराजांचे १३वे वंशज खा. संभाजीराजे छत्रपती यांनी खंडन केले आहे.

खा. संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करून बेंगळुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे. आपल्या ट्विटमध्ये खा. संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे की, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची बेंगळुरात विटंबना करण्यात आली आहे. हे कृत्य निषेधार्ह आहे. बेंगळूरची उन्नती शहाजीराजे यांनी केली हे कदापि विसरू नये. केंद्र आणि कर्नाटक सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे गुन्हेगारांवर तातडीने कडक कारवाई केली पाहिजे. त्यांनी या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई याना टॅग केले आहे.


Recent Comments