अपघातात होणारी जीवितहानी टाळण्यासाठी विजापूर जिल्ह्यात हेल्मेट संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती विजापूरचे एस. पी. एच. डी. आनंदकुमार यांनी दिली.

विजापूर जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने हेल्मेट संदर्भात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील गांधी चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन एसपी एच. डी. आनंदकुमार यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. 
यावेळी बोलताना एच. डी. आनंदकुमार म्हणाले, विजापूर जिल्ह्यात हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. वाहनचालकांनी न चुकता हेल्मेटचा वापर करावा, आणि हेल्मेट घालूनच वाहन चालवावे. हेल्मेटचा वापर न केल्याने अनेक अपघात घडले आहेत. आपल्यासहीत आपल्या पश्चात असलेल्या कुटुंबीयांचा विचार करून प्रत्येकाने हेल्मेट सक्तीने वापरावे, असे आवाहन आनंदकुमार यांनी केले.
या कार्यक्रमादरम्यान गांधीचौक पासून आंबेडकर सर्कल पर्यंत एसपी आनंदकुमार यांच्यासह इतर पोलिसांच्या सहभागाने जनजागृती फेरीचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ. राम अरसिद्धी, गांधीचौक सीपीआय राजेंद्र नायकोडी आदींसह इतर अधिकारीही उपस्थित होते.


Recent Comments