Belagavi

महाराष्ट्र एकीकरण समितीबाबत कठोर भूमिका घेणार : मुख्यमंत्री

Share

 महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नडिगांचे रक्षण करण्यास कर्नाटक सरकार वचनबद्ध आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीवर कठोर कारवाई करण्यात येत आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

बेळगाव विमानतळावर शनिवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते दहशत माजवत आहेत. पोलिसांनी त्यापैकी काहींना अटक केली आहे. सरकार आता महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात कठोर भूमिका घेणार आहे असे ते म्हणाले. महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नडिगांचे रक्षण करण्यास कर्नाटक सरकार वचनबद्ध आहे. या संदर्भात आज बेळगावात अधिकारी पातळीवरची बैठक होत आहे. पोलीस महासंचालक, गृहखात्याचे मुख्य सचिव चर्चा करणार आहेत. गरज पडल्यास मीही महाराष्ट्र सरकारशी चर्चा करणार आहे.

बेळगावात घडलेल्या घटनेला पोलिसांचे अपयश म्हणता येणार नाही. समाजकंटकांनी रात्री येऊन दगडफेक करण्यात काय पुरुषार्थ आहे? पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. तपासातील प्रगतीबाबत माहिती घेण्याची सूचना गृहमंत्र्यांना केली आहे असे बोम्मई म्हणाले. महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालणार का या प्रश्नावर उत्तर देणे मुख्यमंत्र्यांनी टाळले.

 

Tags: