Belagavi

कॅंटोन्मेंट बोर्डाच्या उपाध्यक्षपदी सुधीर तुपेकर यांची निवड

Share

कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयात ब्रिगेडियर रोहित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कॅंटोन्मेंट बोर्डच्या उपाध्यक्षपदी सुधीर तुपेकर यांची निवड करण्यात आली. यावेळी खासदार मंगला अंगडी, उत्तर आमदार अनिल बेनके आदींसह इतर अधिकारी उपस्थित होते.

सुधीर तुपेकर हे बेळगावमधील तेलगू कॉलनी येथील समाजसेवक आहेत. केंद्र सरकारने त्यांच्या समाजसेवेची दखल घेऊन त्यांची कॅंटोन्मेंट बोर्डच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे. सुधीर तुपेकर यांच्या निवडीबद्दल त्याचे अनेक स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. (फ्लो)

यावेळी कृष्ण गणेशकर, प्रकाश बोगेय, प्रमोद पाटील, गौतम पाटील, आनंद पाटील, किशोर खोगले आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: