युवक–युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २३ डिसेंबर रोजी एम्प्लॉयमेंट फॉर ऑल या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती आ. अभय पाटील यांनी बेळगावात दिली.

बेळगावात या संदर्भात माहिती देताना आ. अभय पाटील म्हणाले, बेळगाव परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान, उद्योजकता आणि कौशल्य विकास मंत्री डॉ. अश्वथनारायण यांची भेट घेतली होती. बेळगाव परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. त्यानुसार अश्वथ नारायण यांनी आपल्या खात्यातर्फे बेळगावात दक्षिण मतदारसंघात २३ डिसेंबरला भव्य रोजगार मेळावा आयोजित केला आहे. यात ३ हजार युवक-युवती भाग घेणार आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते या मेळाव्याचे उदघाटन करण्यात येणार आहे आ. अभय पाटील यांनी सांगितले.


Recent Comments