राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या सौंदलगा जवळच मोटर सायकल व कार अपघात होऊन दोन ठार झाल्याची घटना शुक्रवार तारीख 17 रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

या अपघातात ठार झालेल्यांची नावे समजू शकली नाहीत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कार क्रमांक एम एच 03 सीबी 49,15 ही कोल्हापूर कडून निपाणी कडे जात होती. सौंदलगा जवळ आली असता चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून याच रस्त्यावरून निपाणी कडे जात असलेल्या मोटर सायकल क्र. एम एच 09 एफयू 4802 गाडीला धडक बसली. यात मोटरसायकलस्वार ठार झाला. तर कार रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या झाडाला धडकून पुढे सेवा रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या शेतात पडली. या कारमधील महिला ठार झाली.
घटनास्थळी निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अनिल कुंभार, एएसआय विजय पाटील, पोलीस अमर चंदनशिव, एम एफ नदाफ, एन एस सगरेकर यांनी भेट देऊन अपघातग्रस्त वाहनातील जखमींना निपाणी येथील महात्मा रुग्णालयात दाखल केले. जय हिंद रोड डेव्हलपर्सच्या कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.


Recent Comments