डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली नसती, अधिकाऱ्यांनाच सगळे अधिकार दिले असते तर देशात लोकशाही नांदली नसती. देशात कायदा–सुव्यवस्था, शांती, समृद्धी दिसली नसती. त्यामुळेच बाबासाहेब आधुनिक भारताचे पितामह आहेत असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.


व्हॉईस ओव्हर : सुवर्णसौधसमोरील बस्तवाड गावात शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, आज विधिमंडळात बसून काम करण्याची संधी बाबासाहेबांमुळे मिळाली. त्यांनी लिहिलेली घटना जगात सर्वश्रेष्ठ आहे. जगातील कुठल्याही देशांच्या घटनांच्या तुलनेत भारताची घटना नागरिकांच्या अधिक हिताची, माणुसकीची मूल्ये जपणारी आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
याप्रसंगी जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ, आ. बसवराज मत्तिमोड, बेळगाव ग्रामीणचे माजी आ. संजय पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments