विजापूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातील बबलेश्वर परिसरातील वीरभद्रेश्वर देवस्थानाच्या ६१ व्या यात्रेचे आयोजन भव्य प्रमाणात करण्यात आले होते.

गावातील प्रमुख मार्गांवरून या यात्रेच्या निमित्ताने श्री वीरभद्रेश्वराच्या पालखी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. आरती, विविध कला पथक, वाद्यपथकांच्या सहयोगाने पालखी मिरवणुकीचे आकर्षण वाढले होते. या यात्रेत वीरभद्रेश्वर देवाची उपासना करणाऱ्या ४०० पुरवंतांनी सहभाग घेत साहसी खेळांचे प्रदर्शन केले. वीरभद्रेश्वर यात्रेच्या पालखी मिरवणुकीत विविध अलंकारांनी नटलेल्या भक्तांनी प्रदर्शन केलेले साहसी खेळ पाहून अनेकांच्या अंगावर शहरे आले. चिन्नाप्पा मर्यानी या भक्ताने देखील साहसी खेळाचे प्रदर्शन केले.
याचप्रमाणे वीरभद्र गुग्गुळ, जिभेवर टोचून घेण्याची प्रथा, तोंडाच्या आरपार करण्यात येणाऱ्या दोरीचे खेळ, यासारख्या अनेक प्रथांच्या माध्यमातून वीरभद्रेश्वर देवस्थानाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली.


Recent Comments