Banglore

डी. के. शिवकुमार यांच्या शतायुषी आजी निवर्तल्या

Share

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या शतायुषी आजी निंगम्मा यांचे वयाच्या १०६ व्या वर्षी निधन झाले. त्यामुळे अधिवेशनासाठी आलेल्या शिवकुमार यांनी बेळगावहून कनकपूरला प्रयाण केले आहे.

आजारपणामुळे निंगम्मा याना रामनगर जिल्ह्यातील कनकपूर तालुक्यातील दयानंदसागर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी दोड्डअलहळ्ळी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बेळगावात युवा काँग्रेसने आज विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारले आहे. त्यात शिवकुमार सहभागी होणार होते. मात्र आजीच्या निधनामुळे ते कनकपूरला रवाना झाले आहेत.

Tags: