अथणी नगरपालिका वॉर्ड क्रमांक ३ साठी भाजपतर्फे संतोष सावडकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सावडकर यांनी भाजप नेते शिवकुमार सवदी, चिदानंद सवदी यांच्या नेतृत्वाखाली हजारो जणांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अथणी शहराच्या विकासासह प्रभाग क्रमांक ३ च्या विकासासाठी मी आज उमेदवारी अर्ज सादर केला आहे. . केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. अथणी शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाने तयार केलेला विकासाचा जाहीरनामा मतदारांसमोर लवकरच सादर करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी भाजप नेते शिवकुमार सवदी बोलताना म्हणाले, अथणी नगरपालिका निवडणुकीत भाजपने अधिकृतरीत्या जाहीर केलेल्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित आहे. नगरपालिका निवडणुकीत सर्व भाजप उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पराप्पा सवदी, शिवकुमार सवदी, चिदानंद सवदी, मल्लू सवदी, सुमित सवदी, विशाल सगरी, शिवकुमार अपराज, विश्वनाथ तेलसंग आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments