Belagavi

रमेश, लखन यांनी आता तरी सुधारावे : सतीश जारकीहोळींचा सल्ला 

Share

रमेश जारकीहोळी हे सिद्दरामय्या कुठेही असले तरी आमचे नेते म्हणतात, शिवकुमार आमचे मित्र म्हणतात. आपल्याला फायदा होणार असेल तर आम्ही सगळे भाऊ एकच असे सांगतात. फायदा नसेल तर त्याचे डोके फिरले आहे असे मला म्हणतात अशी उपहासात्मक टीका सतीश जारकीहोळी यांनी केली.

गुरुवारी बेळगावात पत्रकारांशी बोलताना केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी म्हणाले, रमेश जारकीहोळी यांचा काही फायदा होणार असेल तर सिद्दरामय्या हे आमचे नेते आहेत, तेच पुढे मुख्यमंत्री व्हावेत असे सांगतात. काहीही विधान करून गोंधळ निर्माण करण्याचे त्यांचे काम आहे. त्यामुळेच रमेश यांच्या बोलण्याला जिल्ह्याच्या राजकारणात किंमत उरलेली नाही.

भाजपने आधीपासून गांभीर्याने प्रचार केला असता तर लखन आउट झाला असता. भाजपने शेवटच्या क्षणी प्रचार केला. लखनला अचानक संधी मिळाली आहे. शेवटच्या क्षणी धडपडून जिंकून आला आहे. आता त्याने स्टडी क्लास लावला पाहिजे. आपली भाषा आणि वर्तन सुधारले पाहिजे. किमान यापुढे तरी रमेश आणि लखन यांनी बदलले पाहिजे असा सल्ला सतीश यांनी दिला.

एकंदर, आपल्याच बंधूंवर टीका करून त्यांना सुधारण्याचा सल्ला सतीश जारकीहोळी यांनी दिला.

 

 

 

Tags: