Belagavi

माजी आ. संजय पाटील याना मुख्यमंत्र्यांना भेटण्यास मनाई

Share

बेळ्गाव ग्रामीणचे माजी . संजय पाटील मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना भेटण्यास गेले असता, पोलिसांनी अडवल्यामुळे त्यांच्यावर ताटकळत राहण्याची वेळ आली

मुख्यमंत्री बोम्मई याना भेटण्यासाठी गुरुवारी माजी आ. संजय पाटील संतीबस्तवाड येथील व्हीटीयूच्या गेस्ट हाऊसमध्ये गेले होते. मात्र पोलिसांनी त्यांना अडवले. आपण माजी आमदार असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र तरीही पोलिसांनी त्यांना आत प्रवेश नाकारला. त्यामुळे ‘काँग्रेसमध्ये असतो तर बरे झाले असते, निदान अशी अडवणूक तर झाली नसती’ अशा शब्दांत संजय पाटील यांनी प्रसारमाध्यमांजवळ आपली नाराजी व्यक्त केली.

त्यानंतर रामदुर्गचे आ. महादेवप्पा यादवाड यांच्या वाहनातून संजय पाटील निघून गेले. एकंदर आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांना भेटायला आपणास मनाई केल्याची सल माजी आ. संजय पाटील याना लागून राहिली.

 

 

Tags: