Chikkodi

पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक

Share

ग्रामीण भागात तसेच शहरी भागात काही जणांकडून सरकारी मान्यता मिळविल्याचे सांगून, पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून पैसे उकळण्याचे काम करण्यात येत आहे. जनतेकडून कोट्यवधी रुपये उकळून फसवणूक केली जात आहे. जनतेने या फसवणुकीपासून सावधान राहावे, अशी सूचना सीपीआय आर. आर. पाटील यांनी दिली आहे.

चिकोडी पोलीस स्थानकात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव, बाकलकोट सह विविध जिल्ह्यातील जनतेकडून दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकलण्यात येत असून नागरिकांची फसवणूक करण्यात येत आहे. यासंदर्भात सांगली येथील पिनॉमिक वेअर्स, एलएलपी सांगली या कार्यालयाच्या चिकोडी विभागात आयएफटी कन्सल्टन्टस एलएलपी चिकोडी आणि वाईका रोटेल अँड टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड, बेळगाव या संस्थांनी ग्राहकांकडून प्रोमिसरी नोट वर जनतेकडून पैसे घेतले आहेत.

या संस्थांविरोधात फसवणुकीची तक्रार चिकोडी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. या संस्थांमध्ये ज्यांनी पैसे गुंतवले आहेत, त्यांनी योग्य कागदपत्रे दाखवून पोलीस स्थानकात आपले नाव नोंदवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर जनतेचे पैसे परत मिळविण्याची व्यवस्था करण्यात येणार असून यासंदर्भात अधिक माहिती कुणाजवळ असल्यास चिकोडी पोलीस स्थानक एएसआय ए के मुरनाळ – ९७३९४४२२९२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. जनतेने अशा प्रकारच्या व्यवहारांसंदर्भात काळजी घेऊन जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या पत्रकार परिषदेला पीएसआय यमनाप्पा मांग यांच्यासह इतर पोलीस विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Tags: