Belagavi

नगरसेवकाच्या प्रयत्नामुळे ड्रेनेज चेंबर लाईन दुरुस्त

Share

बेळगावातील हिंदवाडीतील यशवंत अपार्टमेंटमधील ब्लॉक झालेली ड्रेनेज चेंबर लाईन नगरसेवक नितीन जाधव यांच्या प्रयत्नांमुळे मनपा कर्मचाऱ्यांनी खुली करून दिल्याने तेथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

हिंदवाडीतील यशवंत अपार्टमेंटमधील ड्रेनेज चेंबर लाईन २ वर्षांपासून ब्लॉक झाली होती. त्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करत लागत होता. वारंवार पाठपुरावा करूनही ड्रेनेज चेंबर लाईन दुरुस्त करण्यात आली नव्हती. त्यामुळे रहिवाशांनी नगरसेवक नितीन जाधव यांच्याकडे ही समस्या मांडली. नगरसेवक जाधव यांनी मनपा अधिकाऱ्यांना कळवून कर्मचाऱ्यांकरवी सकिंग मशीनच्या साह्याने ड्रेनेज चेंबर लाईन दुरुस्त करून दिली. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

 

Tags: