काँग्रेस नेते भ्रष्ट्राचारात बुडाले आहेत. कर्नाटकमध्ये टक्केवारी व्यवहार सुरु करण्यात काँग्रेसचा मोठा वाटा आहे, अशी टीका भाजप राष्ट्रीय प्रधान सचिव सी. टी. रवी यांनी केली आहे.
बेळगावमध्ये सुरु असलेल्या सुवर्णविधानसौधमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान प्रसारमाध्यमांशी ते संवाद साधत होते. टक्केवारीचा मुद्दा आपण नाकारत नसून टक्केवारीचे व्यवहार काँग्रेसने सुरु केले असून या टक्केवारी व्यवहाराचा जनक काँग्रेस पक्षच असल्याची टीका सी. टी. रवी यांनी केली आहे. नोटबंदी झाली त्यादरम्यान जयचंद्र, चिक्कराय या दोन अभियंत्यांच्या घरी कोट्यवधी रुपये हाती लागले होते. हे दोघेही सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांचे स्नेही आहेत. यामुळे अशा टक्केवारीच्या नेत्यांना इतर नेत्यांसंदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची प्रतिक्रियाही सी. टी. रवी यांनी दिली.
यानंतर बोलताना सी. टी. रवी म्हणाले, सी सी पाटील सार्वजनिक बांधकाम विभागात होते त्यावेळी कोणत्या पद्धतीचा भ्रष्टाचार झाला आहे, यायचे पुरावे सादर केल्यास त्यांच्यावर योग्य चौकशीचे आदेश नक्कीच देण्यात येतील. पुरावे या अधिवेशनादरम्यान सादर झाले तर उत्तम आहे, अशी प्रतिक्रियाही सी. टी. रवी यांनी दिली.
राजकारणात नेहमीच एकमेकांवर आरोप केले जातात. भाजप सरकारच्या काळात एका अभियंत्याने भ्रष्टाचाराच्या आरोपातून आणि टक्केवारी मागितल्याचा आरोपातून पंतप्रधानांना पत्र लिहिले होते. यानंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये टक्केवारी विषयावरून टीका होत आहेत. काँग्रेस नेत्यांनी टक्केवारीच्या विषयावरून भाजपाला टोला लगावण्यात आला होता. यानंतर पुन्हा भाजपच्या सी. टी. रवी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.


Recent Comments