आमच्या बुट्टीत साप आहे, असे ओरडून काँग्रेस केवळ कांगावा करत असून त्यांच्या बुट्टीत साप वगैरे काहीच नाही ते केवळ फुत्कार काढत असून गोंधळ घालत आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्याचे राजकीय सचिव रेणुकाचार्य यांनी केली आहे.
काँग्रेसच्या ट्रॅक्टर रॅलीसंदर्भात बेळगाव सुवर्णसौध येथे प्रतिक्रिया देताना रेणुकाचार्य म्हणाले, काँग्रेसने भ्रष्टाचाराची निर्मिती केली आहे. काँग्रेस नेत्यांना भ्रम आहे. आणि या भ्रमातून ते आंदोलन करत आहेत. त्यांनी अनेक प्रकरणात भ्रष्टाचार केला आहे. यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा आणि आरोप करण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे रेणुकाचार्य म्हणाले.
ते पुढे म्हणाले, विधिमंडळाच्या अधिवेशनात मुक्त चर्चा करण्यात आली आहे. २०२३ साली होणाऱ्या निवडणुकी भाजप पुन्हा अधिकारात येणार असल्याची चर्चा आहे. काही मंत्र्यांना वर्तन सुधारण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोणावरही वैयक्तीक द्वेष नाही. एकाही मंत्र्यावर आरोप या अधिवेशनात झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस नेते भ्रमामध्ये असून या भ्रमातून ते आंदोलने करत आहेत. सापाचा केवळ फुत्कार करण्यात येत असून विनाकारण गोंधळ माजविण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याची टीका रेणुकाचार्य यांनी केली आहे.


Recent Comments